अध्याय ७
II श्रीराम जय राम जय जय राम II
ऐसे विकल्पाचे वायाणे I कांटे देखोनि सणाणे I जे मतिभ्रमाचें पासावणें I घेतीचिना II 172 II
उजू एकनिष्ठेच्या पाउलीं I रगडूनि विकल्पाचिया भाली I महापातकांची सांडिली I अटवी जिहीं II 173 II
मग पुण्याचे धांवा घेतले I आणि माझी जवळीक पातले I किंबहुना ते चुकले I वाटवधेयां II 174 II
"Lord Krishna said, however those who do not fall prey to Dvandva Moha, who walk the path of righteousness steadfastly trampling the thorns of Vikalpa, successfully cross the dense woods of grave sins or major transgressions. What can be said of such auspicious who evade capture by the bandits Kam (lust or desire) and Krodh (anger)."
II श्रीराम जय राम जय जय राम II
II श्रीसद्गुरूचरणार्पणमस्तु II