अध्याय दुसरा
II श्रीराम जय राम जय जय राम II
ये युक्तिची कडसणी I नाहीं जयाच्या अंतःकरणीं I तो आकळिला जाण गुणीं I विषयादिकीं II 342 II
तया स्थिरबुद्धि पार्था I खहीं नाहीं सर्वथा I आणि स्थैर्याची आस्था I तेही नुपजे II 343 II
निश्चळात्वाची भावना I जरी नव्हेचि देखें मना I तरी शांति केवीं अर्जुना I आपु होय II 344 II
जेथ शांतीचा जिव्हाळा नाहीं I तेथ सुख विसरोनि न रिघे कहीं I जैसा पापियाच्या ठायीं I मोक्षु न वसे II 345 II
देखें अग्निमाजी घापती I तियें बीजें जरी विरूढती I तरी अशांता सुखप्राप्ती I घडों शके II 346 II
म्हणोनि अयुक्तपण मनाचें I तेंचि सर्वस्व दुःखाचें I या कारणे इंद्रियांचें I दमन निकें II 347 II
"The one who doesn't have stable intellect falls prey to the senses easily. Just like sin and liberation cannot coexist, the fluctuating mind is far from being joyful. The contented agitated mind is as improbable as the roasted seeds sprouting when sown. And therefore unstable mind is the root cause of suffering."
II श्रीराम जय राम जय जय राम II
II श्रीसद्गुरूचरणार्पणमस्तु II
No comments:
Post a Comment